ठाकरे सरकारचा निर्णय; राज्यात लॉकडाऊन वाढला, १ जूनपर्यंत कडक निर्बंध राहणार

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. मात्र, कडक निर्बंधामुळे महाराष्ट्रातील रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचे राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. काय (१२ मे) राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यात सुरु असलेले कड़क निर्बंध १५ मे नंतर वाढवावे अशी मंत्र्यांनी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुसार महाराष्ट्रातील १५ मे पर्यंत असलेल्या कडक निर्बंधांची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांमधील असणं आवश्यक आहे. या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

काय असतील निर्बंध?

 1. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध वाढवले
 2. लोकल मेट्रो प्रवासावर निर्बंध कायम
 3. राज्यात प्रवेश करताना rtpcr निगेटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक
 4. परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताना ४८ तासांचा rtpcr रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक
 5. भाजीपाला, किराणा घरपोच मिळणार
 6. अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार
 7. दुध विक्री, माल वाहतूकीस परवागनी
 8. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा
 9. माल वाहतूक प्रवासामध्ये २ जणांना प्रवासाची परवानगी
 10. बाजार समितीत कोरोना नियम पाळणे अनिवार्य
 11. आठवडा बाजारान प्रशासनाची करडी नजर

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा