Thackeray-Shinde | ठाकरे अन् शिंदे गट पुन्हा आमने-सामने!, ‘गद्दार’ची पुन्हा घोषणाबाजी

Thackeray-Shinde | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी (Bhavana gawli) काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. यावेळी ठाकरे-शिंदे (Thackeray-Shinde) गट समोरा समोर आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केली आहे. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या देखील मारल्या.

एकनाथ शिंदे आणि 40 आमदार सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपसोबत युती करून राज्यात पुन्हा सरकार स्थापन केलं. हे सरकार पाडून भाजप सोबत जाण्यासाठी 50 खोके मिळाले असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतात.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.