Thackeray vs Shinde | राजकीय वातावरण तापणार! ; ठाकरे-शिंदे यांच्या आज जाहीर सभा
Thackeray vs Shinde | औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याच आज राजकीय वातावरण तापणार आहे. आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे आज जाहीर सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा आज शेतकरी संवाद दौरा आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सभा घेतील. त्यामुळे हे दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिल्लोडमध्ये पाचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर अकोल्यात शेतकरी संवाद यात्रेनंतर आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे ही सभा होणार आहे. बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. बंडादरम्यान गुवाहटीवरुन पळून आलेले आमदार नितीन देशमूख याच मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यामुळे या सभेत आदित्य ठाकरे आक्रमक भाषण करणार असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात –
पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढय़ासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजप मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले, असं देखील ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Goverment Job Alert | इंडो-तिबेट सीमा दलात (ITBP) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Prashant Damle | प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Shrikant Shinde | “मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे…”, तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “मशालच्या पहिल्या विजयानंतर मिंधे गट…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | “… म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.