Thackeray vs Shinde | ठाकरेंचा शिंदेंना जोरदार दणका! सत्ता संघर्षासाठी मांडला ‘हा’ जबरदस्त डाव

Thackeray vs Shinde | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. पक्ष विरोधात बंड करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावी, अशी मागणी त्यांनी नार्वेकरांना केली.

A different twist to the Thackeray vs Shinde debate

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Thackeray vs Shinde) लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलताना ते म्हणाले, “आम्ही विधानसभा अध्यक्षांना विनंती केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंडखोर आमदारांची लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी. राहुल नार्वेकर यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत ते लवकरात लवकर निर्णय देतील, अशी आशा आहे.”

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये अनिल परब शिवसेनेचे (युबिटी) आमदार विलास पोतनीस, रवींद्र वायकर आणि रमेश कोरगावकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाचा (Thackeray vs Shinde) निर्णय घेण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीमध्ये बैठका घेतलेल्या असून 16 आमदारांना अपात्र ठरवल्याच्या चर्चा आहे. ठाकरे गटाच्या बैठकीनंतर सर्व कायदेशीर चौकशी करून 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43t1uqG