ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक

मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . यावर जावेद अख्तरने शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करत आपले मत मांडले. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुकही केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे, त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही,’ असं देखील अख्तर यांनी या लेखात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं २०१९ च्या विधानसभा निकालानंतर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे विराजमान होतील या अटीवर उदयास आल्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशातील विविध सर्व्हेंमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे सर्वोत्तम व लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात असल्याचे समोर आले होते.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा