Thane | संतापजनक! आधी तरुणीला छेडलं अन् जाब विचारताच तिला फरफट नेलं

मुंबई : ठाणे येथील स्टेशन रोड परिसरात शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक रिक्षा चालकाने एका तरुणीला फरफटत घेऊन जातानाचा एक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. पीडित तरुणी आपल्या कामानिमित्त जात असताना त्या ठिकाणी हा रिक्षाचालक आला आणि त्या रिक्षाचालकाने तरुणीला इशारे करत छेड काढली होती.

रिक्षा चालकाने तरुणीची काढली होती छेड –

तरुणीची छेड काडल्यानंतर विरोध केला असता या रिक्षाचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला पळण्यापासून रोखले. रिक्षाचालक रिक्षात बसून पळत असताना तरुणीने त्याच्या कॉलरला धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा सुरू करून या तरुणीला फरफटत घेऊन गेला.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, काही वेळ फरफटत गेल्यानंतर तरुणी पडली. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. तरुणीला फरफटत घेऊन जाणारा हा रिक्षाचालक पोबारा करण्यात यशस्वी झाला. रस्त्यावर पडलेली तरुणी ही जखमी अवस्थेत रस्त्यावर त्याच अवस्थेत पडून होती. नंतर नागरिकांनी त्या तरुणीला उचलून बाजूला केलं. हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे.

ठाणे येथे महिला असुरक्षित ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच ठाणे येथे महिला असुरक्षित असल्याचा देखील दावा केला जात आहे. भर दिवसा उजेडात असा प्रकार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.