Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Thane Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अटेंडंट (Attendant) पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Thane Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Thane Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने  अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

जाहिरात पाहा (View ad)

https://thanecity.gov.in/tmc/cache/1/27-Mar-23/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1679920518783/Attendant%20jahirat%20pdf.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

महत्वाच्या बातम्या