ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र

महानगरपालिका व जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या ‘ महापौर वर्षा मॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले.

तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे. वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंटू यादवने नाशिक येथील असल्याचे दाखवले होते. मात्र, त्याच्याकडे त्याविषयी कोणताच अधिकृत पुरावा नव्हता. विजयी स्पर्धकांची कागदपत्रे तपासताना ही बाब समोर आली. त्यामुळे पिंटू यादव याला अपात्र ठरवण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी, स्मार्ट मॅरेथॉन’, असं आजच्या स्पर्धेचं ब्रीदवाक्य होतं. स्पर्धेसाठी देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू दाखल झाले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पर्धेला फ्लॅगऑफ केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 12 वर्षांखालील लहान मुलांसाठी, 18 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि रन फॉर स्मार्ट सिटीची स्पर्धा आय़ोजित करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.