अल्लाहमुळे मी कोरोनावर मात करु शकलो , पाकिस्तानी क्रिकेटरचा अजब दावा

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर हा देखील कोरोनाच्या विषाणूच्या विळख्यात अडकला होता. अल्लाहमुळे मी करोनाचा पराभव करू शकलो असं त्याने म्हटलं आहे.

मोठी बातमी : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात

त्यानं सांगितले की,दोन आठवड्याच्या आयसोलेशन नंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अल्लाहमुळे मी तंदुरुस्त झालो आहे. या संकटकाळात प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय आणि योग्य पाऊलं उचलायला हवी.

सांगली ते कोल्हापूर प्रवास करणं संभाजी भिडेंना पडलं महागात

उमरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तो 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर आलेला त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरनं लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.38 वर्षीय खेळाडूनं कोरोनाची लागण झाल्याचे समजताच योग्य ती काळजी घेतली त्यामुळे तो आता बरा झाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.