InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘हरहर काँग्रेस, घरघर काँग्रेस’असे फलक लावून कॉंग्रेसने मानले सरसंघचालकांचे आभार

चंद्रपूर – नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना काँग्रेसचे नेते दिसतात. पण याला चंद्रपूरमध्ये अपवाद दिसून आला. शहरात सरसंघचालक काँग्रेसच्या फलकावर झळकत आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसच्या योगदानाचे भागवत यांनी कौतुक केल्याने काँग्रेसच्या वतीने त्यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत.

काँग्रेस नेहमीच आरएसएसवर स्वातंत्र्य संग्रामातील योगदानावरुन टीका करत असते. पण काँग्रेसच्या योगदान बहुमूल्य असल्याचे सरसंघचालकांनी स्वत:च मान्य केल्याने चंद्रपूर शहर काँग्रेसने त्यांचे विशेष आभार मानले आहे. या फलकावर ‘हरहर काँग्रेस, घरघर काँग्रेस’ असेही नमूद करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.