InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आंध्र लोकप्रतिनिधीने केलं ‘या’ कृतीचं समर्थन

- Advertisement -

आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीनं मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावानं आमदारकीची शपथ घेतली असून या प्रकारामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

श्रीधर रेड्डी यांनी नेल्लोर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आंध्र विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वसाधारणपणे नवनिर्वाचित आमदार किंवा नवनियुक्त मंत्री ईश्वर, राज्यघटना किंवा विवेकबुद्धीला स्मरून शपथ घेतात. मात्र, श्रीधर रेड्डी यांनी शपथ घेताना मुख्यमंत्री जगनमोहन यांचं नाव घेतलं. विधानसभा अध्यक्ष संबांगी अप्पाला नायडू यांनी रेड्डी यांना लगेचच रोखले आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली.

यावर खुलासा देताना श्रीधर रेड्डी यांनी स्वत:च्या या कृतीचं समर्थन केलं. तेलुगू देसम पक्षाच्या काही आमदारांनीही यापूर्वी एनटी रामाराव यांच्या नावे शपथ घेतलीय. त्यांना तशी परवानगीही मिळाली होती. मी माझ्या नेत्याला देव मानत असेल तर काय चुकलं,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘मी एका सामान्य कुटुंबातून आलोय. कुठलीही आशा-अपेक्षा नसताना जगनमोहन यांनी मला दोनदा आमदार बनवलंय,’ अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.