राजकीय भूमिका मांडल्याने कलाकाराला मालिका सोडावी लागते, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुनच; रोहित पवार संतप्त

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. अल्पावधीच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात.अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत.

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. मात्र अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढण्यात आल्याचं सांगितलं आहे.

यानंतर यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल.’ असे ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा