InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

शाहरुखच्या पार्टीतून ‘हा’ अभिनेता जेवण न करताच परतला

अभिनेता आमिर खान सध्या तो त्याचा आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढामुळे चर्चेत आहे. सध्या आमिर या सिनेमाचं शूट करत असून त्यानं या सिनेमासाठी मागच्या काही महिन्यांपासून बरीच मेहनत घेतली आहे. याशिवाय त्यानं या सिनेमातील त्याच्या लुकवरही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले होते. त्यानंतर या सिनेमाच पहिलं पोस्टर सुद्धा रिलीज झालं. त्यामुळे सध्या आमिरच्या सिनेमाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

‘दंगल’चं शूटिंग सुरू असताना एकदा अभिनेता शाहरुख खान आमिरला पार्टीसाठी निमंत्रीत केलं होतं. या पार्टीला आमिर गेलाही मात्र तिथून जेवण न करताच परतला.आमिरनं स्वतः या पार्टीतील एक मजेशीर किस्सा सांगितला. या कार्यक्रमात त्याला पार्टीला गेल्यावर तो तिथे जेवतो का असा प्रश्न विचारण्यात आला यावर आमिर सांगतो, ‘मी माझ्या आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असतो आणि मी माझा डाएट प्लान काटेकोरपणे पाळतो.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.