अनेक वर्षांनंतर कमबॅक करतेय ही अभिनेत्री

अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. पहिल्या पोस्टरमध्ये जॉन दिसला आणि दुस-या चित्रपटामध्ये चित्रपटाची हिरोईन दिव्या खोसला कुमार. होय,लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळलेली दिव्या पुन्हा एकदा कमबॅक करतेय. या चित्रपटात दिव्या मुख्य हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे.

2004 साली अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयों’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचवर्षी ‘लव्ह टुडे’ या साऊथच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगा झाला.

लग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली. 2014 मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवत, ‘यारियां’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. 2016 मध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले.

आता ती पुन्हा एकदा अभिनयात परतण्यास सज्ज झाली आहे. साहजिकच दिव्या प्रचंड उत्सुक आहे. ‘सत्यमेव जयते 2’मध्ये मला फीमेल लीड म्हणून संधी दिल्याबद्दल जॉन आणि दिग्दर्शक मिलाप जवेरी यांचे मी आभार मानते. माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. जॉनचे मी विशेष आभार मानेल. कारण एका विवाहित अभिनेत्रीसोबत काम करताना अभिनेत्यांच्या मनात अनेक पूर्वग्रह असतात. पण जॉनच्या मनात असे काहीही नाही, असे ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.