रानू मंडल यांच्यावर होतेय बायोपिकची निर्मिती

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यांनी सिंगर हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या सिनेमासाठी एका गाणं गायलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

या सिनेमाविषयी ऋषिकेश मंडल सांगतात, रानू मंडल यांचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यांच्या बाबत अधिकाधिक जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे हा सिनेमा तयार कराण्याचा निर्णय मी घेतला. अभिनेत्री सुदीप्ताला मी यासाठी विचारलं कारण या सिनेमात रानू यांच्या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देऊ शकते असं मला वाटतं. तिनं या सिनेमाला होकार दिल्यानंतर बाकी इतर कलाकारांची निवड केली जाणार आहे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.