InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सकल मराठा मोर्चा बंदचे आवाहन ९ ऑगस्ट क्रांती दिन उदगीर शहर कडकडीत बंद

- Advertisement -

उदगीर/प्रतिनिधी : सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीरात मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद, मराठा समाजाच्या आरक्षण मागणी सह अन्य मागण्यासाठी उदगीर शहर कडकडीत बंद पाळण्यात येत असून, समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चक्का जॅम करण्यात आले असून, चौकामध्ये महिलांसह युवकांनी सहभाग घेत मृदंग, टाळ घेऊन भजन, कीर्तन करत सरकार विरोधात घोषणा व गाणी गायण्यात आले.

उदगीर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत मराठवाड्यातील उदगीर शहरची सर्वात मोठी आडत बाजारपेठ म्हणून ओळख असणारी बाजार पेठ ही बंद असून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्या बंद असून सर्व खाजगी वाहतूक बंद आहे. तर व्यापारी तसेच विविध उद्योग आणि सर्व प्रकारची किरकोळ दुकाने बंद असून, आरोग्य सेवा वगळता सर्वच सेवा सुविधा बंद आहेत.
उदगिर येथे रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच अंबुलन्सला सुरळीत रास्ता करून देण्यात आला, ही व्हॅन लातूर च्या दिशेने काही सेकंदात रवाना झाली.

Loading...

- Advertisement -

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी- विखे पाटील

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.