आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार: देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे गुरुवारी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात आले. आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

“राज्य सरकारने तातडीने मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी आणि ओबीसी समाजाच्या लोकसंख्येविषयी जिल्हानिहाय सर्वेक्षण करून अहवालाच्या आधारावर आरक्षण वाचविण्यासाठी तातडीने हालचाल करावी, यासह एवढ्या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा करणारे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.

“ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करून लोकसंख्येनिहाय तपशीलवार आकडेवारी (इम्पिरिकल डाटा) तयार करायला सांगितली होती. पण, राज्याने अशी कोणतीही कारवाई १५ महिने केली नाही. त्यामुळेच हे आरक्षण गेले. या संदर्भात सभागृहात आणि पत्र पाठवून सातत्याने पाठपुरावा केला होता,” असे फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा