InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुलवामा हल्ल्यानंतरची कारवाई माझ्या सल्ल्यानेच – शरद पवार

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात तीनशेहून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते.

त्यावेळी मोदी महाराष्ट्रात यवतमाळच्या दौऱ्यावर होते. आमची दिल्लीत बैठक सुरु होती त्यावेळी मोदी इकडे बोलत होते, मैं चौकिदार हू, देश की सुरक्षा मेरे हात मे हैं. देश को कुछ होने नहीं दुंगा. तिकडं जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचं सोडून ही ५६ इंचची छाती यवतमाळ मधून हे बोलत होती, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.