InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार

सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची पहिली परीक्षा 12 जुलैला होत आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या त्रिसदस्य खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षण वाचवण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची फौज असेल. देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, विशेष सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर सरकारची बाजू मांडतील. मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील यांनीही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने माजी सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार लढणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply