‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखाच सोशल मीडियावरुन मांडला आहे. मोदी सरकाने किती पारदर्शी आणि विकासात्मक काम केल्याचं भाजपाने म्हटले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही मोदींच्या 7 वर्षीय वाटचालीतील विकासाची घोडदौड सोशल मीडियातून सांगितली आहे. तसेच, न्यूज वृत्त वाहिन्यांमध्येही डिबेट शो सुरू होते. एका डिबेट शोमध्ये संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.

भाजपने देशातील मोठ्या संस्थांचंही नुकसान केलं आहे. मोदी सरकार चीनचं नाव घ्यायलाही घाबरत आहे. पण इंदिरा गांधींनी जगाचा नकाशा बदलून पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावरून संबित पात्रा भडकले. यामुळ मुद्यावरून भटकून चर्चात चीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता.

त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याचा मुद्दा चर्चेत आणला. त्यावेळी, किती रुपयाची घेवाण-देवाण झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याच्या या खोट्या आरोपावरून सुप्रिया श्रीनेत भडकल्या आणि त्यांनी संबित पात्रा यांना जोकरपंती म्हटलं. त्यासोबत संबित पात्रा गटारीतले किडा आहे, असं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा