InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अॅड. सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता

मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैद्यनाथ पाटील हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. याबाबत वैद्यनाथ यांचे भाऊ संभाजी मुणगे पाटील यांनी माहिती दिली आहे. वैद्यनाथ पाटील हे संभाजी ब्रिगेड आयोजित करत असलेल्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात, असंही संभाजी पाटील यांनी म्हटलं आहे.

वैद्यनाथ पाटील यांनी अॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला केल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वैद्यनाथ पाटील हे मूळचे जालना जिल्हातील आहेत. त्यांचे आई-वडिल हे गावी शेती करतात. वैद्यनाथ पाटील यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तसंच ते नोकरीच्या शोधात पुण्याला आले होते, असं त्यांच्या भावाने म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैद्यनाथ पाटील यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या आहेत.  वैद्यनाथ पाटील यांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केल्यानंतर इतर वकिलांनी वैद्यनाथ पाटील यांनाही मारहाण केली आहे.

राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर कोर्टात काय घडलं याची माहिती सदावर्ते हे प्रसार माध्यमांना देत होते, त्याचवेळी वैजिनाथ पाटील या मराठा युवकाने हल्ला केला.

मराठा आरक्षण हे मृगजळासारखे आहे, त्याच्या नादी लागू नका असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या अविनाश गायकवाड यांनी केले आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायलयाच्या आवारत हल्ला करण्यात आला.

या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा असं आहे असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी हे आरक्षण म्हणजे मृगजळासारखे आहे त्याच्यावर अवलंबून राहू नका असे म्हणत अपवाद म्हणून हे आरक्षण देण्यात आलं आहे असंही प्रवीण गायकवाड यांनी दिलं आहे

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.