‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांसाठी योग्य नाही, तो त्यांच्या पायाच्या नखाबरोबर आहे’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नंदमुरी बालाकृष्ण यांनी नुकतेच भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

“फक्त ऑस्करच नाही तर मी भारताचा सर्वोच पुरस्कार, भारतरत्नही मानत नाही. माझा असा विश्वास आहे की, भारतरत्न प्रतिष्ठित पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता,” असं नंदमुरी बालाकृष्ण यांनी म्हटलं आहे.

तेलुगू चित्रपट सृष्टीत माझ्या कुटुंबाच्या योगदानाची बरोबरी कोणताही पुरस्कार करु शकत नाही. मला वाटतं की भारतरत्न हा पुरस्कार एन.टी.आर यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. सर्व पुरस्कार म्हणजे माझ्या पायाच्या धुळी समान असल्याचं बालाकृष्ण म्हणाले.

दरम्यान, “माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाहीत,” असंही बालाकृष्ण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा