मोठी बातमी : ‘या’ तारखेला कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उदय सामंतांनी दिली माहिती

मुंबई : गेले २ वर्षे जवळपास कोरोना महामारीशी संपूर्ण महाराष्ट्र लढत आहे. यानंतर आता राज्यात दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे आजपासून राज्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसंच काल उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती.

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासोबतच कॉलेजसही सुरु होणार अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज कॉलेज सुरु करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यानंतर पुढे उदय सामंत यांनी पुढील निर्णय घेतला आहे. कुलगुरू यांची काल बैठक झाली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

यावेळी ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर त्यासंबंधीची माहिती दिली जाईल, असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा