मोठी बातमी : 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील लहान मुलांना कोरोनाची लस देण्यात येणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

भारत बायोटेक कंपनीला 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC)ने शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल 525 मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3 ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज 2 चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.

2 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2 आणि फेज 3 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस SEC ने केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा