“नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य; ‘समीर वानखेडेंवरील आरोप खोटे ठरले तर मी राजीनामा देईन”

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तसेच हा जन्माचा दाखला हा दाखला खोटा असल्याचे व आपण धर्म बदलला नसल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले होते. मलिक यांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते. समीर यांच्या वडिलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले होते व मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता मलिकांनी या प्रकरणात चांगलीच उडी घेतली असून ‘मी दिलेली माहीती खोटी आढळल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’, असं म्हटलं आहे.

समीर वानखेडेंवर कारवाई करण्याची मागणी सध्या करण्यात येत असून सरकारमधील मंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने त्याचे चांगले वाईट राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होणार?, आणि आता नवाब मलिकांचे आरोप खोटे ठरल्यास ते राजीनामा देणार असं त्यांनी म्हटलंय, याबाबत पुढे काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा