InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्रिपदाबाबत युवासेनेचे सरदेसाईं यांचा मोठा खुलासा

लोकसभा निवडणुकीच्या  यशानंतर आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना-भाजप महायुती कामाला लागली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या वक्तव्याला राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही समर्थन दिले होते.

एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य आणि प्रतिक्रिया येत असताना, अखेर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटवरुन मोठं वक्तव्य केलं आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या तडजोडीच्या बैठकीला उपस्थित नसलेल्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.” असे  ट्विट युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.