InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर आज सकाळी शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणाकडे आधीपासूनच विकत घेतलेले शेअर्स असल्यास त्यांनी ते विकू नयेत. तसेच या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. रिपोर्टनुसार, इन्फोसिसनं नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे.

इन्फोसिसबाबतीत व्हिसलब्लोअर्सने कंपनीच्या बोर्डाला या प्रकरणात एक पत्र 20 सप्टेंबरला लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं की, इन्फोसिस स्वतःचा नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत आहे. कंपनीचे सध्याचे सीईओ सलील पारेखही यांचाही यात सहभाग आहे. तर दुसरं एक पत्र 27 सप्टेंबरला अमेरिकी शेअर बाजार रेग्युलेटर यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनलाही देण्यात आलं आहे. खरं तर इन्फोसिसचा एडीआर हा न्यूयॉर्क एक्स्चेंजमध्येही आहे. सोमवारी ADR 12 टक्क्यांहून खाली घसरला होता. त्यामुळेच इन्फोसिसचे शेअर्स 15 टक्क्यांनी अधिकनं पडले आहेत.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.