भाजपाला पण माहिती आहे कि, मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही

सातारा : सक्तवसूली संचालनालयाकडून मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाना, मंत्री हसन मुश्रिफ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याविरोधात पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट ईडीला आव्हान दिलं आहे.
आज साताऱ्यातील कटापुर याठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजपवर गंभीर आरोप केलेत. तसेच शिंदे यांनी सोमय्या यांच्यावर टीका करत ईडी, प्राप्तीकर विभागाला आव्हान दिलं. भाजपच्या ईडाल पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले.
तसेच पुढे “भाजपाचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात यावं म्हणून मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय. तसेच मला वाटतं तेव्हा १०० कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असंही मत व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर
- भाजपाचं माझ्यावर इतकं प्रेम की १०० कोटी रुपयांची ऑफर दिली, पण… : शशिकांत शिंदे
- “अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”
- सुटका नाही ! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन पुन्हा न्यायालयाने फेटाळला
- जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार : किरीट सोमय्या