“भाजपला कोरोना झाला कारण, त्यांनी खूप पाप केलं आणि पाप केलं की कोरोना होतोचं”

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील खेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपवर जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपने आपला शब्द फिरवला म्हणून त्यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणाले.

“भाजपने युतीतही गद्दारी केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं,’ असं संजय राऊत यावेळी कार्यक्रमात म्हणाले. तसेच ‘भाजपला कोरोना झाला कारण त्यांनी खूप पाप केलं होतं. पाप केलं की कोरोना होतो,” अशी टीकाही राऊत यांनी यावेळी भाजपवर केली आहे.

पुढे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडताना, “आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय. सत्ता हा आमचा आत्मप्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ होतं. विद्यमान आमदारांना थोडी तरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं,” असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा