लोकसभा अध्यक्ष असणार भाजपचे ‘हे’ खासदार

राजकीय वर्तुळातील मोठ्या नावांवर फुली मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांचं नाव निश्चित केलं आहे. ‘टाइम्स नाउ’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बिर्ला हे राजस्थानमधील दक्षिण कोटा येथून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी, ते तीनदा विधानसभा सदस्य देखील राहिले आहेत.

लोकसभा अध्यक्षपदासाठी मनेका गांधी, राधामोहन सिंह, एस. एस. अहलुवालिया यांच्यासह अनेक नावांची चर्चा होती. मात्र, मोदींनी पारंपरिक संकेतांना फाटा देत बिर्ला यांचं नाव निश्चित केलं आहे. ५७ वर्षीय बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष झाल्यास ते आठवेळा खासदार राहिलेल्या माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची जागा घेतील.

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.