InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नागपुरातील सावली फाटा येथे तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नागपुरातील सावली फाटा येथे तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीचा चेहरा विद्रुप केला गेल्यामुळे या तरुणीची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

या तरुणीच्या तोंडावर ॲसिड फेकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय या तरुणीचा एक हात तोडून टाकण्यात आल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply