मिताली राजची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे ठणकावून सांगणारी धाकड गर्ल, जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही महिला क्रिकेटपटूंचा आदर करावासा वाटला तिचं नाव आहे मिताली राज.

मितालीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय. यात मितालीची भूमिका अभिनेत्री साकारणार आहे. तापसी सध्या करिअरच्या शिखरावर आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमा तापसी बॉलिवूडला देते आहे. या सिनेमाचे नाव शाबाश मिठू असे आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन करतो आहे.

तापसीनेही मितालीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत मिताली केप कापताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तापसीने लिहिले आहे, ”तुम्ही आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. माझे हे भाग्य आहे की तुमची भूमिका मला पडद्यावर साकारायला मिळते आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.