शेतकऱ्यांपुढे केंद्र झुकले, या आंदोलनाची जगभर दखल घेतली जाईल : छगन भुजबळ

मुंबई : नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. हा शेतकऱ्यांच्या अभूतपुर्व एकजुटीचा विजय असून या आंदोलनाची देशाच्या इतिहासात व जगात नोंद घेतली जाईल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यासंदर्भात श्री. भुजबळ म्हणाले, आज सकाळीच एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी मंजूर केलेले कृषी कायदे सर्व मागे घेतले आहेत. त्याबद्दल एक वर्षाहून अधिक काळ लाखो शेतकरी आंदोलन करीत होते. त्या कायद्यांना विरोध करीत होते. उत्तर प्रदेश सीमेवर धरणे धरून बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणूकांमध्ये भाजपाला मोठे अपयश मिळाले. आता पुन्हा उत्तर प्रदेश सहीत अनेक प्रांताच्या निवडणुका येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची आवश्यकता भासली की काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण असे असले तरी देर आये दुरुस्त् आये. सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा