पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे जनता कंगाल होत असताना मोदी सरकार मालामाल झाले आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-2021मध्ये केंद्र सरकारचा इंधनावरील उत्पादन शुल्क महसूल 88 टक्क्यांनी वाढून 3.35 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. सरकारनेच लोकसभेत ही माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव प्रचंड घसरले होते. तरीही मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात विशेष कपात केली नव्हती. त्यानंतर मे 2020 मध्ये पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात विक्रमी वाढ करण्यात आली होती. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.

यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात आखाती देशातूून येणाऱ्या तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकार किंमती कमी करेल अशी अपेक्षा होती.

परंतू त्यावेळी देखील केंद्र सरकारने किंमती कमी केल्या नाही. त्याउलट मे 2020 पासून किंमती आणखी वाढल्या होत्या. गेल्या 7 महिन्यात पेट्रोलच्या मागणीत 10 टक्क्यांची घट झाल्याचं देखील समोर आलं आहे. तर कराच्या माध्यमातून सरकारला मोठा नफा झाल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा