InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

केंद्र सरकार बेरोजगारीडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे – पी. चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सत्ताधारी भाजपावर देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून निशाणा साधला. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र केंद्र सरकार याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी आरोप केला. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.

चिदंबरम म्हणाले, की देशातील उच्चशिक्षीत तरुणवर्गाला सध्या बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेवूनही अनेकांच्या हाताला काम नाही. खलाशी पदाच्या ६२,९०७ जागांसाठी ८२ लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यातील ४ लाख १९ हजार १३७ उमेदवार बी.टेक. पदवी उत्तीर्ण आहेत. तर ४० हजार ७५१ उमेदवार हे मास्टर ऑफ इंजिनिअर्स आहेत. या आकडेवारीवरून स्पष्टपणे देशातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार बेरोजगारीवर उपाययोजना करण्यात सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे.

लोकसभेत भाजपा व मित्र पक्षांचे मिळून ३५२ खासदार आहेत, मग बेरोजगारीचा महत्त्वपूर्ण प्रश्न दुर्लक्षीत कसा काय राहतो? बहुमत असूनही देशातील तरुणांना काम देण्यासाठी हे सरकार का प्रयत्न करत नाही ? असे प्रश्न चिदंबरम यांनी यावेळी उपस्थित केले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply