InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

केंद्र सरकार शंभर दिवसात मेघा भरती करणार

केंद्र सरकारने १६७ परिवर्तनशील कल्पनांची यादी तयार केली असून याची अंमलबजावणी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या १०० दिवसांत उच्च शिक्षण संस्थांमध्ये रिक्त ३ लाख पदांची मेगाभरती केली जाणार आहे.

या सारख्या कल्पनांची अंमलबजावणी ५ जुलै ते १५ ऑक्टोबर दरम्यान केली जाणार असल्याचे समजते. क्षेत्रीय सचिवांच्या गटाने केलेल्या शिफारशीच्या आधारावर कॅबिनेट सचिव प्रदीप के. सिन्हा यांनी याबाबत सर्व सचिवांना कळविले आहे. या शिफारशींवर मंत्रिगटाचे मत विचारात घेऊन १०० दिवसांत १६७ परिवर्तनशील कल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply