InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालावरुन मुख्यमंत्री का घाबरत आहेत? – जयंत पाटील

मागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला आहे. “या अहवालावरुन मुख्यमंत्री का घाबरत आहेत,” असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.

“सरकारकडे मागास वर्ग आयोग अहवाल मागितला तर तो इंग्लिशमध्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा अहवाल येऊन किती आठवडे झाले.  मुख्यमंत्री का घाबरत आहेत? या अहवालातील काही गोष्टी समोर आल्या तर काही घटक दुखावले जातील, याचा सरकारला आत्मविश्वास नाही की भीती वाटते,” असं जयंत पाटील म्हणाले.

“सरकारने आज दुपारी तीन वाजता गटनेत्यांची बैठक बोलावली होती होती. पण आता ही बैठक उद्या सकाळी दहा वाजता होणार असल्याचं कळलं. यावरुन सरकारची भूमिका ठरलेली नाही, म्हणून ते चालढकल करत आहेत,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply