InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार- राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रवेश औपचारिकता राहिली असून ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काँग्रेसने माझी कोंडी केली असून आता पक्षात माझी घुसमट होत असल्याचं त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.