InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गाडीतलं पेट्रोल काढून मुलाने आईला जिवंत जाळलं

- Advertisement -

आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याला 9 महिने पोटात वाढवणाऱ्या आईला मुलानेच जिवंत जाळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे महिला यामध्ये गंभीररित्या भाजली आहे. तर शेजाऱ्यांच्या मदतीमुळे तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला संगम पार्कमध्ये राहणारी आहे. मोहन असं तिच्या मुलाचं नाव आहे. घरात झालेल्या वादामुळे तरुणाने गाडीतलं पेट्रोल काढून त्याने आईला जिवंत जाळलं. दरम्यान, मोहन आणि त्याची पत्नी नोकरी करतात. त्यांची 13 वर्षांची मुलगी आहे. आई नातीची नीट काळजी घेत नसल्यामुळे त्यांच्या घरात सतत वाद  होत होते. त्यातून हा प्रकार झाला असल्याचा आरोप खुद्द आरोपी मोहन याने केला आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.