‘हे’ ऐकून आयुक्तही झाले अचंबित

औरंगाबादमधील शासन निधीतील रस्ते कामांची मुदत संपत आली असली तरी अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. महापालिकेचे नवे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी (ता.९) विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यात ‘गेल्या नऊ महिन्यांत फक्त आठ किलोमीटर रस्त्यांची कामे’ झाल्याचे समोर आल्यानंतर तेही आचंबित झाले. 30 रस्त्यांची कामे संपविण्यासाठी तुम्हाला 15 जानेवारीची मुदत देतो? त्यानंतर मी सर्व ताब्यात घेईन, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

राज्य शासनाने शहरातील रस्ते कामासाठी शंभर कोटीचा निधी दिला आहे. त्यातून 30 कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; दोन वर्षे उलटली तरी या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. कंत्राटदारांना रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत देण्यात आली आहे. कामांची गती पाहता मुदतीत कामे पूर्ण होणे अशक्‍य आहे. सोमवारी आयुक्तांनी आढावा घेतला असता आतापर्यंत आठ किलोमीटरची कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. जानेवारीत कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. दोन महिने उशिराने कामे सुरू झाली.

नऊ महिन्यांत केवळ आठ किलोमीटरची कामे झाली का? असा प्रश्‍न केला. ड्रेनेज, पाइपलाइन शिफ्ट करणे, पोल, रोहित्र हटविणे अशा कामांमुळे विलंब झाल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी तुम्हाला 15 जानेवारीपर्यंचा वेळ देतो, नंतर मी सर्व ताब्यात घेईन, अशी तंबी आयुक्तांनी दिली.

महापालिकेतील समांतर पाणीपुरवठा योजना व एलईटी प्रकल्प देशभर गाजले. त्यामुळे आयुक्तांनी या दोन्ही योजनांची सखोल माहिती सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. एलईडी प्रकल्पासाठी किती पैसा जातो? अशी विचारणादेखील त्यांनी केली.

शहराच्या पाणीपुरवठ्याचा आढावाही आयुक्तांनी घेतला. शासनाने मंजूर केलेल्या 1,680 कोटी रुपयांची योजना कोणत्या स्तरावर आहे. शहरात किती बेकायदा नळ आहेत याची माहिती अधिकाऱ्यांना आयुक्तांनी विचारली. त्यावर अधिकाऱ्यांना बेकायदा नळांची माहिती सांगता आली नाही. समांतरच्या कंपनीने केलेला सर्व्हे आपल्याला मान्य नसल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. प्लॅस्टिक विरोधी कारवाई तीव्र करण्याची सूचना आयुक्तांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना केली. सरकारी कार्यालयात महापालिकेचा एक कर्मचारी नियुक्त करण्याचे आयुक्तांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.