InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अखेर काँग्रेसचं ठरलं..! हंगामी अध्यक्षपदी आता ‘मोतीलाल व्होरा’चं

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं. पण आता या निवडीत हंगामी अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा याचं नाव पुढे येत होत. आणि अखेर आता हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply