‘सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे ‘पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हे लोकसभेची लढवणार नाहीयेत. यावरून भाजपच्या आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांना शाब्दीक चिमटे काढलेत. त्यांनी ट्विटरवरून या घडामोडींबाबत भाष्य करताना म्हटले आहे की ‘सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे ‘पृथ्वीअस्त्र’ भयभीत होऊन पळाले’.

पृथ्वीराज चव्हाण पोटनिवडणूक लढवणार की विधानसभा निवडणूक लढविणार याविषयीच्या तर्कवितर्कांना काँग्रेसने मंगळवारी पूर्णविराम दिला होता. काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज यांच्यासह 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.

पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात पराभूत झाल्यास राजकीय करीअरच संपून जाईल, या भीतीने पृथ्वीराज यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली होती. काँग्रेसने त्यांना दक्षिण कराडमधून निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी भाजपाचे अतुल भोसले यांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.