InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

टँकरखाली दबून तरुणाचा जागीच मृत्यू

देवळा तालुक्यातील मेशी इथे पाणी टंचाईने एकाचा  बळी घेतला आहे. पाण्याने भरलेला टँकर पलटी होऊन एका तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. सोपान चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, पाण्याने भरलेला टँकर पलटी होऊन त्याखाली दबून सोपानचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी देवळा तालुक्यातील मेशी इथे ही घटना घडली. गिरणा कालव्यातून पाणी भरून जात असताना एका वळणार ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागातील अनेक गावांना आजही भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईने या तरुणाचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply