InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंद पाळण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली होती.

नवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. बंदऐवजी ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असं मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ठाणे आणि नवी मुंबईतील दुकानं, आस्थापनं सुरू राहतील.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

 

Sponsored Ads

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.