InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार-अण्णाराव पाटील

काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. मात्र आम्ही आमची निवडणुकीची तयारी सुरू केली आहे,’ अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला नागपुरातून सुरुवातही करण्यात आली आहे.

वंचित आघाडीकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्याही समावेश असल्याची माहिती वंचित आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र त्यापूर्वी आम्ही विधानसभेच्या संपूर्ण 288 जागांवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचंही अण्णाराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply