ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत; राजेश टोपेंच मोठं वक्तव्य

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. मुंबई करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. तर मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईत करोनाची तिसरी लाट अटळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. संपूर्ण लॉकडाउन नाही तर, मिनी लॉकडाउन लागू शकतो, अशी दाट शक्यता आहे. यानंतर आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या काहीशी स्थिरावताना दिसतेय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना स्थिती आढावा घेतला.
या आढाव्यानंतर त्यांनी राज्यातल्या कोरोना स्थितीची माहिती पत्रकार परिषद दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात केव्हा लॉकडाऊन लागणार, याबाबतची माहिती त्यांनी दिली. राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत, असं टोपेंनी ठणकावून सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?; फडणवीसांनी उडवली खिल्ली
- मुंबईतील १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावं; किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान
- उद्धव ठाकरे ‘रयत’ संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही माझी मागणी चुकीची आहे का?; शिंदेंनी पुन्हा पवारांना डिवचले
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच असतील; शरद पवारांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांची केराची टोपली..!
- ‘फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही गोव्यात कितीही नोटा टाका, शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल’