InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुणे ते शिर्डी 8 पदरी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी

- Advertisement -

सुजय विखे यांनी लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचा प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पातील भाषणावर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभार व्यक्त करताना, सुजय यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नही मांडले. त्यामध्ये, शिर्डी हे धार्मिक तिर्थक्षेत्र असून भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे, शिर्डीसाठी पुणे ते शिर्डी या 8 पदरी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

शिर्डी मतदारसंघातील प्रश्नाबाबत बोलताना, अध्यक्ष महोदय आपण शनिवारी किंवा रविवारी शिर्डीला येऊन पाहा. शिर्डीत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. शिर्डी हे देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यात, पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे ते शिर्डी हा 8 पदरी महामार्ग करावा, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे भारतमाला 2 योजनते पुणे ते औरंगाबाद या 8 पदरी महामार्गाचे कामही प्राधान्याने घ्यावे, अशीही मागणी सुजय यांनी ससंदेतील भाषणावेळी केली. आपल्या संसदीय कारकिर्दीतील सुजय विखेंचं हे पहिलचं भाषण होतं, ज्यामध्ये त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष वेधले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.