औरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी

: मराठा अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असा इशारा उद्याेजकांनी दिला आहे.

स्वत: पाेलिस अायुक्त वाळूजमध्ये बंदाेबस्तावर असताना कंपन्यांना संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल वाळूजच्या उद्याेजकांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कंपन्या बंद ठेवणार असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येईल. तसेच जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. , , औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले. त्यामुळे उद्योजक आक्रमक झाले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याकरिता उद्योजकांकडून बैठक बोलावण्यात आली. या बैठकीस सुमारे १००० उद्योजक हजर होते.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.