शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे, शरद पवारांनी पाठिंबा देण्याऐवजी कायद्यात बदल सुचवावा

मुंबई : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लाल वादळ काल रात्री अखेर मुंबईत दाखल झालं. या महामोर्चात राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या सहभागी झाले असून आज राजभवनावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मोर्चाचा पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालं

यावर आता शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे. दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे योग्य नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी कायद्यात बदल सुचवायला हवा, असे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.