भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे : नाना पटोले

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच शरद पवार युपीएचे नेते होणार का? असा सवाल ममता बॅनर्जींना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला आगामी लोकसभेत डच्चू देणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

यानंतर आता यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पटोलेंनी सध्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले, असे पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा